खुलताबाद, (प्रतिनिधी) श्री क्षेत्र वेरूळ येथे जगदुरु जनार्दन स्वामी यांच्या ३६ वे पुण्यस्मरण निमित्त उत्तराधिकारी जगगुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये श्रीक्षेत्र वेरूळ येथे घृष्णेश्वर भगवान यांच्या सानिध्यामध्ये होणार आहे. या सोहळ्याचे पूर्वतयारीचे अनुषंगाने रविवार रोजी भव्य ध्वजारोहण सोहळा झाला.
सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य अनुष्ठान यज्ञ नंदादीप महिला जप नामस किर्तन एकनाथी भागवत पारायण अखंड अन्नदान अशा महत्वपूर्ण विविध कार्यक्रमाचे आयोजन या सोहळ्यामध्ये केले आहे. ३६ व्या पुण्यस्मरणाचे प्रमुख आकर्षण ७५१ कुंडी यज्ञ हे असून यादरम्यान आठ दिवस मौनवृत्तांमध्ये पुरुष व महिला हे परमपूज्य बाबाजींनी दिलेल्या गुरु मंत्राचा जप करणारा आहे. याची संख्या ११ हजार आहे. आठ दिवस होणारा हा सोहळा जगदुरु उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
जय बाबाजी भक्त परिवारासह महाराष्ट्रातील लाखो भाविक पूजनीय साधुसंत व राजकीय क्षेत्रातील विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती या सोहळ्यामध्ये असते. जय बाबाजी भक्त परिवाराच्या दृष्टीने परमपूज्य बाबाजींचे पुण्यस्मरण म्हणजे मोठा सोहळा असतो भाविक वर्षभर या सोहळ्याची तयारी करत असतात हा भव्यदिव्य सोहळा यशस्वी होण्यासाठी जगगुरू स्वामी शांतिगिरी महाराज
यांचे मार्गदर्शनाखाली विविध समित्याची नियुक्ती केलेली असते.
यामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत नाही लाखो भाविकांची उपस्थिती सोहळ्याला आठ दिवस असताना परमपूज्य बाबाजींचे पुण्यस्मरणाची सोहळे महाराष्ट्र सह देशभर या सोहळ्यांचा कौतुक होता ना दिसते. कारण या सोहळ्यामध्ये देव देश आणि धर्म हे समोर ठेवून येणारी पिढी घडविण्याचे काम बाबाजींच्या हस्ते होत असते. दिवसेंदिवस लाखो लोक वेगवेगळ्या व्यसनांना बळी पडत आहे. त्यातून मुक्ती देण्याचे महान कार्य जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने सातत्याने होत आहे.
असाच प्रयत्न होऊ घातलेल्या पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये परमपूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. आजच्या पवित्र पर्वकाळावर या भव्य सोहळ्याचे ध्वजारोहण बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, देवगड संस्थांचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाश नंद गिरी महाराज ह. भ. प. मेटे महाराज आश्रम हे संत महंत सेवागिरी महाराज उद्योजक मनोज पवार अनिल चोरडिया घृष्णेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विकी दांडगे, उपाध्यक्ष योगेश टोपरे माजी सभापती गणेश अधाने यासह जय बाबाजी भक्त परिवारातील नाशिक, जळगाव धुळे, अहिल्यानगर, जालना, पुणे, ठाणे, बीड, परभणी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांची रथामधून मिरवणूक :
वेरूळ आश्रमामधून आज ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले होते. यामध्ये परमपूज्य बाबाजी यांची पालखी व उत्तराधिकारी जगद्रुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांची रथामधून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये जय बाबाजी भक्त परिवारासह बाबाजींच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. अनेक मान्यवर बाबाजीच्या मार्गदर्शनाने सोहळ्याचा समारोप होऊन महाप्रसादाने याची सांगता झाली.
सोहळ्यामध्ये भाविक भक्तांनी तन, मन, धनाने सहभागी व्हावे :
२५ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या दरम्यान आयोजित ओम जगद्वरु जन शांती धर्म सोहळ्यामध्ये भाविक भक्तांनी तन मन धनाने सहभागी व्हावे, असे आवाहनन जय बाबाजी भक्त परिवाराचे वतीने राजेंद्र पवार यांनी केले.















