मुंबई या हायस्पीड रेल्वे मार्गाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात मात्र औरंगाबादचे नाव नसल्याने औरंगाबाद ला वगळले की काय अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. तसेच हायस्पीड रेल्वे मार्गात औरंगाबाद हायस्पीड रेल्वेचा प्रश्न कागदावरच आहे की काय? असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात असून हायस्पीड रेल्वेत औरंगाबाद चा देखील समावेश असावा यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि खा. इम्तियाज जलील यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले.
मराठवाड्याच्या विकासाला गती मिळावी यासाठी औरंगाबाद ला हायस्पीड मध्ये घेणे आवश्यक आहे. औरंगाबाद शहर औद्योगिक शहर असल्याने हायस्पीड रेल्वे मार्ग असणे अत्यंत आवश्यक आहे. हायस्पीड रेल्वे मार्गासाठी माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्याकडे प्रस्ताव देखील दिला होता. त्यात मुबंई-पुणे-औरंगाबाद- नांदेड आणि नागपूर मार्गे हायस्पीड रेल्वे मार्ग व्हावा अशी आमची मागणी केली होती. त्यांनी मागणी मान्य करून सर्वे करण्याचे देखील सांगितले असल्याचे माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
अधिवेशनात बोलणार : खा. इम्तियाज जलील
औरंगाबाद शहर झपाट्याने वाढत आहे. त्यातच औद्योगिक शहर असल्याने हायस्पीड रेल्वे मार्गाचा संपूर्ण मराठवाड्याला याचा फायदा होईल. असे खा.इम्तियाज जलील यांनी सांगितले. येणार्या अधिवेशनात हायस्पीड रेल्वे मार्गात औरंगाबादचा देखील समावेश असावा यासाठी प्रश्न उपस्थित केला जाईल असेही त्यांनी सांगितले.