सिल्लोड, (प्रतिनिधी) : हे वर्ष माऊलींचे सातशे पन्नासवे जयंती वर्ष आहे. सोमवारी वसई लगतच्या गंगेश्वर महादेव मंदिर परिसरात अजान वृक्ष व सुवर्णपिंपळ या दोन दुर्मिळ व वारकरी संप्रदायामध्ये वंदनीय महत्त्व असलेल्या झाडांचे रोपण केले.
सिल्लोड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गती विधी पर्यावरण विभागाचे जिल्हा सहकार्यवाह डॉ. संतोष पाटील यांच्या हरित वारी व लोकराज्य महाभियांन अनुलोम उपविभाग जालना तथा भाग सिल्लोडचे जनसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने हे वृक्षारोपण झाले.
आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळी सातशे वर्ष हून अधिक वयाचा अजान वृक्ष आहे.
आळंदी येथे २ हजार २०० वर्ष वयाचा पुरातन सुवर्णपिंपळ हा वृक्ष आहे. सुवर्ण पिंपळ हा वृक्ष साक्षात धनाची देवता कुबेराने लावला आहे अशी धारणा आहे. या वृक्षास माऊलींच्या माता रुक्मिणी देवी यांनी सव्वा लक्ष प्रदक्षिणा
घातल्या आहेत. या सुवर्णपिंपळाच्या सानिध्यामध्ये माऊलींनी ज्ञानसाधना केली आहे.
या दोन्ही देव वृक्षांना वारकरी संप्रदाय व हिंदू धर्मात व खूप मोठे पर्यावरण मूल्य आहे. या दोन्ही झाडाच्या मूळ बिजापासून डॉ. पाटील यांनी रोप निर्मिती केली आहे. असे हजारहून अधिक झाडे हरितवारी या उपक्रमातून राज्यातील विविध मंदिर धार्मिक ठिकाणे वारकरी शिक्षण संस्था शाळा या ठिकाणी हिंदू धर्मातील धार्मिक महत्त्व असलेली विविध झाडे महाराष्ट्रभर रोपण करून वाढवली आहे.
संस्थानचे महंत भिकन महाराज, जगदीश कळात्रे, अंकुश सावळकर, गजानन मिरगे, डॉ. पाटील, सुनील गायकवाड, संजय मंदाडेर, प्रकाश गव्हाणे ई उपस्थिती होती.