भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा अभिवादन

Foto
 भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा अभिवादन
गंगापूर, (प्रतिनिधी)  नारायणपूर ग्रामपंचायत : कार्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच नासेर पटेल, उपसरपंच मजीद शेख, तालुका कृषी अधिकारी रवि किरण दीक्षित, सदस्य दीपक खरात, ग्रामपंचायत लिपीक मुक्तार शेख,
मोबिन शेख, महादेव चांदगुडे, विजय सपकाळ, शिवाजी दामोदरे, आशा वर्कर शबाना शेख, दिव्या शिरसाट, अंगणवाडी सेविका सुवर्णा खरात, इर्शाद बी. शेख, उषा जमधडे, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी वक्त्यांनी डॉ. कलाम यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तरुण पिढीने त्यांचे आदर्श अंगीकारून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे सरपंच नासेर पटेल आवाहन करण्यात आले.