सिल्लोड, (प्रतिनिधी) कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त वांगी बु येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन कुंभार समाज तालुकाध्यक्ष योगेश पवार तसेच समाज बांधवाच्या वतीने करण्यात आले होते. अभिवादन कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते संत गोरोबाकाका कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी सरपंच बापू काकडे, सरपंच बाळू साळवे, ग्रामरोजगार सेवक सुरेश साळवे, आबा साळवे, विजय साळवे, संतोष काकडे, संदीप काकडे, गणेश शिंदे, मंगेश पवार, सचिन साळवे, विलास दांडगे, तातेराव जाधव, ज्ञानविकासचे रायभान जाधवसह गावकरी व समाज बांधव उपस्थित होते.












