गंगापूर शहरात शिवजयंतीनिमित्त अभिवादन; युवकांचा जल्लोष

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी)। छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने अभिवादन करण्यात आले. 

शिवतीर्थ उद्यान, नगर परिषद येथे आयोजित मुख्य कार्यक्रमास नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय जाधव, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, मुख्याधिकारी संतोष आगळे, उपनगराध्यक्ष अमोल जगताप, संतोष अंबिलवादे अविनाश पाटील तसेच सर्व सन्मानीय नगरसेवक, मान्यवर व नागरिक यांच्या उपस्थितीत छत्रक्राती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महाराज की जयपत च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते. बावेळी शिवजयंती निमित्त साम्राज्य ग्रुप आयोजीत भव्य रॅली काढण्यात आली आहे. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची उजळणी करत त्यांच्या पराक्रम, न्यायनिष्ठा, स्त्रीसन्मान, धर्मनिरपेक्षता व स्वराज्याच्या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या तरुण पिढीने शिवचरित्राचा आदर्श घेऊन समाजकार्य, राष्ट्रकार्य तसेच स्वच्छ व सुत्तंस्कृत शहर उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. 

शिवजयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व सुवर्ण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवित शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक संदेश दिला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

तसेच दिवसभर शहरात विविध सांस्कृतिक, सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रम पार पडले. सायंकाळी विशेष आतिषबाजी व आकर्षक रोषणाईचे आयोजन करण्यात आले असून शिवतीर्थ उद्यान परिसर प्रकाशमय झाला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गंगापूर शहरात शिवजयंतीच्या निमिताने उत्साह, एकोप्यावी भावना आणि शिवप्रेमाचा अनोखा जल्लोष पाहायला मिळत असून संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले आहे.