वैजापूर येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त वैजापूर येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून बाळासाहेबांना श्रद्धांजलीवाहिली. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, तालुका प्रमुख मनाजी मिसाळ, जिल्हापरिषद सदस्य मनोज गायके, उपजिल्हा प्रमुख अॅड. रमेश सावंत, पंचायत समिती सदस्य हुसेन शेख,
युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल डमाळे, अॅड अनिल रोठे, साहेबराव मतसागर, दादासाहेब आव्हाळे आदींची उपस्थिती होती.