टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : न्यू हायस्कूल येथे टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. वक्तृत्व स्पर्धा घेतली. 

ज्येष्ठ शालेय समिती सदस्य जवाहर कोठारी यांनी लोकमान्य टिळकांच्या बालपणीच्या आठवणी जागृत करून स्वाभिमानी बाण्याची आठवण विद्यार्थ्यांना करून दिली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अतिशय महत्वाची भूमिका विषद केली. मुख्याध्यापक साळुंके यांनी लोकमान्य टिळकांच्या आठवणीसह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा रशियापर्यंचा प्रवास व्यक्त करून त्यांचे मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापनेत असलेली भूमिका व कार्य वर्णन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. 

यावेळी कृष्णा पाटील, मनोज धनाड, संतोष निकम सर, रिजवान शेख सर, दिलीप मांजरमे, प्रज्ञावंता केरे या शिक्षकांबरोबरच अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले.