१३ कोटी ३३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जवळपास १३ कोटी ३३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. भूमिपूजन झालेले काम तातडीने सुरू करण्यासह काम गुणवत्ता पूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

भूमिपूजन करण्यात आलेल्या कामामध्ये सिल्लोड आवारात एकूण ९१ नवीन गाळे बांधकाम करणे ११ कोटी, त्यासोबतच
सिल्लोड आवारात १ कोटी ३१ लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट काँक्रीटकरण करणे आरसीसी गटार नाल्या बांधकाम करणे तसेच अंभई, शिवना उपबाजार आवारात सिमेंट काँक्रीटकरण करणे व सोयगाव आवारात स्ट्रीट लाईट बसविणे यासाठी १ कोटी २ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड मार्केट कमिटीच्या विविध विकास कामांसाठी १३ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे सभापती विश्वास पा. दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, रमेश लाठी, शेख जावेद, जयराम चिंचपुरे तसेच किशोर अग्रवाल, राजेंद्र ठोंबरे, सुदर्शन अग्रवाल, पांडुरंग जैवळ, सुखदेव जाधव, हनिफ मुलतानी, ज्ञानेश्वर जाधव, रमेश कासलीवाल, सतीश गौर, विलास शिंदे, सत्यनारायण गट्टानी, विजय पवार, मोसीन देशमुख आदिंसह आवारातील व्यापारी, शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.