पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

Foto

सरसकट २० हजार नुकसान भरपाई देण्याची मागणी
रमेश लिंबोरे
पैठण, (प्रतिनिधी) ;  नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. त्यामुळे नाथसागर जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रात तीन लाख सहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुराचे पाणी पैठण शहरातील सखल भागात घुसले. संत नगर, कहार गल्ली या भागातील पूर्ण घरे पाण्यात गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,
तसेच शहरातील सखल भागातील अनेक दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आमदार विलास भुमरे यांच्या आदेशाने नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सखल भागातील नागरिकांना नाथ हायस्कूल, कहार समाज समाज मंदिर, अभिनंदन मंगल कार्यालय, कन्या हायस्कूल, जिल्हा परिषद हायस्कूल, प्रतिष्ठान कॉलेज येथे हलवण्यात आले होते. 

त्यामुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने पाटेगाव जवळ असलेला पैठण - शेवगाव रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने पैठण शहराचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटला. नवगाव येथील पूल पाण्यात गेल्याने नवगावचा पैठण शहराशी संपर्क तुटला. तसेच गोदाकाच्या अनेक भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. २००६ ची पुनरावृत्ती झाली आहे. २४ वर्षानंतर पुन्हा एकदा पैठण तसेच गोदाकाठच्या १४ गावांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान आमदार विलास भुमरे यांनी रविवारी पुरग्रस्त बाधीत नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.