छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): क्रेडाई छत्रपती संभाजीनगरतर्फे १४ ऑक्टोबरपासुन सुरू झालेल्या ड्रिमहोम एक्सपोला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी (दि.१६) औद्योगिक सुटीचा फायदा घेत ३ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी या एक्सपोला भेट दिली. तर २५० पेक्षा जास्त घरांचे बुकींग या एक्सपोमध्ये आतापर्यंत झाले आहे. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही भेट देऊन एक्सपोचे कौतुक केले.
एक्सपोमध्ये २५० पेक्षा जास्त घरांचे बुकींग झाले आहे. दरवर्षी नवरात्रातमध्ये क्रेडाई छत्रपती संभाजीनगरतर्फे ड्रिमहोम एक्सपोचे आयोजन केले जाते. एक्सपोमध्ये बँकांसह बांधकाम व्यवसायाशी संबंधित अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पदनांचे स्टॉल आहेत. या एक्सपोला
डीपीआर तातडीने मंजुर करा: क्रेडाईची मागणी
▶ शहराचा डीपीआर तातडीने मंजुर करण्यात यावा, अशी मागणी क्रेडाईतर्फे उद्घाटनाच्या कार्यक्रमात केली होती. मनपाचे माजी आयुक्त असिमकुमार गुप्ता हेच नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत, तेच डीपी प्लॅन करणार असल्याचे महापालिकेचे पूर्वीचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले होते. पण डीपीआर मंजुर झाला, तर अनेक ठिकाणी नव्याने प्रकल्प उभारणी केली जाऊ शकते. नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे या डीपीआर मंजुरीकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी क्रेडाईने केली आहे.
आज (दि. १७) आणि रविवारी (दि. १८) जास्त नागरिक भेटी देण्याची शक्यता व्यक्त केली. हा एक्सपो सकाळी दहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला आहे. एक्सपोचे मुख्य प्रयोजक एसबीआय असून प्लॅटिनम प्रायोजक मनजीत प्राईड ग्रुप आणि विस्तार भूमी, गोल्डन प्रायोज, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक या एक्सपोमध्ये बांधकाम
व्यवसायिक, वित्तीय संस्था आणि बांधकाम व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या विविध गोष्टींचे स्टॉल असणार आहेत. या एक्सपोमध्ये विविध १५० हुन अधिक प्रकल्पांची (रेरा नोंदणीकृत) माहिती ग्राहकांना मिळणार आहे. ज्यामध्ये १५ लाखापासून ते ५ कोटी पर्यंतचे फ्लॅट, रो हाऊस, पेन्ट हाऊस, बंगले, प्लॉट, दूकाने, व्यापारी संकुल, ऑफिस यांचा समावेश आहे.













