अतिथी देवो भव...'

Foto
एक विदेशी पर्यटक महिला व पुरुष हे जोडपे रात्रीच्या काळोखात रस्ता भरकटते आणि प्रचंड तणावात आता करायचे काय? या प्रश्नात गुरफटते. मात्र काळोखाच्या रात्रीत सुदैवाने या विदेशी जोडप्याला मदत करून भारतीय संस्कृतीचे दर्शन काहीजणांनी घडविले. त्यात माणुसकीच्या नात्याने रेल्वे प्रवाशी सेना आणि पोलिसांनी मदत करून अन अतिथी देवो भव ची ओळख करून दिली.

पर्यटनाची राजधानी म्हणून शहराची ओळख असल्याने अनेक देशातील विदेशी पर्यटक प्रतिदिन पर्यटनस्थळांना भेटी देतात. या पर्यटकांना माणुसकीच्या नात्याने मदतही केली जाते. 'अतिथी देवो भव' याची प्रचिती विदेशी पर्यटकाने आपल्या माणुसकीच्या दर्शनाने रेल्वे प्रवाशी सेना आणि पोलिसांनी विदेशी पर्यटकांना मदत करून दिले. युनायटेड किंगडम येथील विदेशी पर्यटक ऍडम ख्रिसोफर मॅकब्राईड आणि मॅकब्राईड जेने क्लेअर हे गुरुवारी रात्री वेरूळ येथे जाण्यासाठी कल्याण येथून मनमाडला आले. आणि मनमाड येथे जनरल तिकीट काढून चुकीने रात्री ८ वाजून ३० मिनिटाने मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेस मध्ये बसले आणि लासुर येथे उतरले. परंतु वेरूळ कडे जाण्यासाठी एकही साधन येथे त्यांना मिळाले नाही. अंधारात भरकटले आणि प्रचंड तणावात होते. त्यांना रेल्वे प्रवाशी सेनेचे सदस्य मनोज मुथा आणि पियुष मुथा यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ रेल्वे प्रवाशी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना माहिती दिली. माहिती मिळताच सोमाणी मदतीसाठी धावून आले. लासुर येथील स्टेशन मास्टर शैलेंद्र कुमार आणि सिलेगाव पोलीस स्टेशनचे शौकद अली सय्यद ,सीताराम पोळके यांनाही विदेशी पर्यटक रस्ता चुकल्याची माहिती देण्यात आली माहिती मिळताच ते मदतीला धावून गेले. याशिवाय ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ मदतीसाठी राठोड आणि बोर्डे या दोन कर्मचाऱ्यांना मदतीसाठी पाठविले. सर्वजण मदतीला धावून गेले आणि विदेशी पर्यटकांना ' आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्हाला सुखरूप पाठवितो..' असा विश्वास दिला. आणि त्यांचा पाहुणचार करून अतिथी देवो भवचे दर्शन घडविल्याने विदेशी पर्यटक भारावून गेले. त्यानंतर त्यांना रेल्वे प्रवाशी सेनेचे अध्यक्ष सोमाणी आणि पोलीस राठोड, बोर्डे यांनी रात्री बारा वाजेच्या सुमारास वेरूळ येथील त्यांनी बुकिंग केलेल्या हॉटेल मध्ये त्यांना सुखरूप पाठविण्यात आले. 
विदेशी पर्यटकांनी केला आनंद व्यक्त
अंधारात रस्ता भरकटलेल्या विदेशी पर्यटकांना मदत मिळताच त्यांनी आपल्या माणुसकीच्या नात्याचे भरभरून कौतुक करत आभार मानले. आणि अतिथी देवो भव हीच खूप मोठी आठवण आम्ही बरोबर घेऊन जाऊ असे समाधान व्यक्त करून आपल्या पोलीस, रेल्वे प्रशासन आणि रेल्वे प्रवाशी सेनेचे आभार मानले.