बालविवाह, पॉक्सो कायद्याबाबत न्यायाधीश निखिल हेमणे यांचे मार्गदर्शन

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): तालुका विधी सेवा समिती व गंगापूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर येथील धूत कन्या विद्यालय तसेच एस.बी. महाविद्यालय येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी गंगापूर न्यायालयाचे तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी निखिल हेमणे उपस्थित होते. 

यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना बालविवाह प्रतिबंधक कायदा घंव पॉक्सो कायदा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांचे संरक्षण, लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण तसेच कायद्याने दिलेले अधिकार याबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, गंगापूर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अनिल इंगळे, उपाध्यक्ष अॅड. तुकाराम कोल्हे, अॅड. प्रिया बर्वे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थिनींनी कायद्याशी संबंधित विविध विषयांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थिनींनी कायद्याबाबत जागरूक राहून अन्याय किंवा अत्याचाराच्या घटना घडल्यास त्याविरोधात आवाज उठवावा, तसेच आवश्यकतेनुसार कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती व गंगापूर वकील संघाच्या वतीने आयोजित या कायदेविषयक जनजागृती शिबिरामुळे विद्यार्थिनींमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली. 

याप्रसंगी गंगापूर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. ए. एस. इंगळे-पाटील, उपाध्यक्ष अॅड. टी. व्ही. कोल्हे, तसेच अॅड. व्ही. एस. मनोरकर, अॅड. ए. बी. कुलकर्णी, अॅड. ए. एस. बर्वे, अॅड. एम. एस. पाटदार आणि अॅड. पी. एस. बर्वे यांनी विविध कायदेविषयक विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका संजीवनी बेंद्रे, गंगापुर, केंद्रप्रमुख गोपाळे, गुणवत्ता कक्ष सदस्य पंचायत समीती गंगापूर दत्ता घोगरे, तलाठी गणेश लोणे, पर्यवेक्षिका शास्त्री विदुला व सर्व शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होते.