गुरुनानकांचा प्रकाशपर्व उत्साहात साजरा होणार

Foto
सागर प्रकाशनचे
सांजवार्ता
Page No.: 6 Date: 21/11/2026
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांचा ५५७ वा पावन प्रकाशपर्व २४ नोव्हेंबर रोजी उस्मानपुरा येथील गुरुद्वारा गुरुसिंह सभा येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अमृतसर येथील दरबार साहिबचे हजुरी रागी भाई दविंदर सिंह बटाला विशेष कीर्तन सेवेसाठी उपस्थित राहणार आहेत.
२२ नोव्हेंबर रोजी सकाळी अखंड पाठ साहिबला प्रारंभ होईल. २३ नोव्हेंबर रोजी रात्री विशेष रैन सबाई दीवान आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भाई गुरमीत सिंह आणि भाई दविंदर सिंह बटाला गुरबाणी कीर्तन सादर करतील. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी अखंड पाठ साहिबची समाप्ती झाल्यानंतर मुख्य गुरुपर्व दीवान होईल. यामध्ये विविध
उद्यापासून तीन दिवसीय कार्यक्रम
गुरुद्वारांतील रागी जत्थ्यांकडून कीर्तन सेवा केली जाईल. दुपारी १२.३० ते २ या वेळेत भाई दविंदर सिंह बटाला यांचे विशेष गुरबाणी कीर्तन होणार असून, त्यानंतर लंगर आयोजित करण्यात आला आहे. मुख्य प्रकाशपर्वाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता भव्य नगरकीर्तन काढण्यात येणार आहे. याशिवाय १४ ते २३ नोव्हेंबरदरम्यान दररोज पहाटे ५.३० वाजता प्रभातफेरी काढली जात आहे. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष हरविंदर सिंह बिंद्रा यांच्यासह पदाधिकारी व सेवेकरी परिश्रम घेत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions