दोन ठिकाणांहून ३० लाखांचा गुटखा जप्त एफडीएची मोतीकारंजा व नवाबपुऱ्यात कारवाई

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील अवैध गुटखा विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी (दि. २७) रात्री मोठी कारवाई केली. मोती कारंजा आणि नवाबपुरा या दोन अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात एकाच वेळी अचानक धाडी टाकून ३० लाख रुपयांहून अधिक किमतीचा बंदी असलेला गुटखा जप्त करण्यात आला. या धाडसी व धडक कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर गुटखा माफिया आणि विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
राज्य शासनाच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळ करणाऱ्यांविरोधात तसेच प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. या अंतर्गत गुप्त माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पहिल्या पथकाने सोमवारी रात्री मोती कारंजा, मोंढा परिसरातील सय्यद वाजेद सय्यद फारुख,
तस्करांचे धाबे दणाणले
▶ अन्न प्रशासन विभागाचे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त दयानंद पाटील व अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, योगेश चिभडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या मोहिमेमुळे शहर आणि परिसरातील अवैध गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
सय्यद माजेद सय्यद फारुख आणि सय्यद साजेद सय्यद फारुख या तिन्ही आरोर्पीच्या घराची पथकाने झडती घेतली असता नामांकित बँड्सचा १४ लाख २ हजार ४०५ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थसाठा आढळून आला. तो साठा पथकाने जप्त केला. दुसऱ्या पथकाने याच बाबा लॉज, नवाबपुरा येथील इमारतीखाली एक अवैध गोडाऊनवर टाकलेल्या धाडीत पानमसाला, सेंटेड टोबॅको
या प्रतिबंधित बँड्सचा १६ लाख २७ हजार ८८ रुपये किमती माल जप्त करण्यात आला. दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईतून एकूण ३० लाख २९ हजार ४९३ रुपये किमतीचा घातक व प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिन्ही मुख्य आरोपींसह पुरवठादार आणि संबंधित कंपन्यांव्यतिरिक्त क्रांती चौक व जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions