सिल्लोड, (प्रतिनिधी) मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (एमजीव्हीएस) छत्रपती संभाजीनगर अंतर्गत गुरुवारी (दि. २३) लिंकवर्कर प्रकल्पातील हळदा गाव तालुका सिल्लोड येथे उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणी लिंकवर्कर प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग अंतर्गत जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे, जिल्हा पर्यवेक्षक संजय पवार, आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था या संस्थेचे प्रकल्प संचालक
अप्पासाहेब पाटील उगले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या जिल्हा साधन व्यक्ती अन्नपूर्णा यांच्या उपस्थितीत हे शिबिर घेतले.
या शिबिरात एकुण ४१ लोकांचे एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी केली. यात उपस्थित लोकांचे एचआयव्ही तपासणी वनिता शिनगारे सुपरवायझर यांनी केली. उपस्थित लोकांना एचआयव्ही एड्स विषयी सविस्तर माहिती लिंक वर्कर अरुण चव्हाण देशमुख यांनी दिली. तसेच इतर लोकांची रक्त शर्करा, रक्तदाब तपासून त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला डॉक्टर विशाल सोळंके वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उंडणगाव यांनी दिला.
यावेळी उपस्थित सुवर्णा हिवाळे समुदाय आरोग्य अधिकारी रामकृष्ण डोईफोडे, सुपरवायझर आरोग्य सेवक अविनाश दसरे ए. जी. सुरूशे प्रयोगशाळा तंत्रज्ञ सोनाली चौधरी, आरोग्य सेविका के. पी. डांगरे आशा वर्कर जयश्री साबळे. राधा सुरवाडे व उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
तसेच उपस्थित लोकांना लिंक वर्कर अरुण चव्हाण देशमुख यांनी लिंक वर्कर प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देऊन या कॅम्पमध्ये इतर राज्यातील कामगारांचे सुद्धा एचआयव्ही तपासणी करण्यात आली. तसेच उपस्थितांना एचआयव्ही होण्याचे मुख्य चार कारणे सांगण्यात आले.














