छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): कपाटाचे लॉक दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात शिरून कपाटातील ४ तोळे सोने, ७० ग्रॅम चांदी आणि ७० हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्याला पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. २९ मे रोजी याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत माग काढत २ जून रोजी नंदुरबार येथून या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले ४ तोळे सोने आणि ५० ग्रॅम चांदी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्या अटकेमुळे अनेक मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रधानसिंग ऊर्फ पठाण बक्तारसिंग शिकलीकर (४४, रा. एकतानगर, नेळवा
नंदूरबारचा रेकॉर्डवरील आरोपी
पुंडलिकनगर ठाण्यातील पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक अर्जुन राऊत, अंमलदार प्रकाश डोंगरे, शिवाजी शिंदे, संदीप बीडकर, विलास सोळंके, अजय कांबळे, बालोत यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तो नंदूरबारचा रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या ताब्यातून ३० ग्रॅम सोन्याचा नेकलेस, ८ ग्रॅम सोन्याची पोत, १ ग्रॅम सोन्याचा ओम, ३० ग्रॅम चांदीचे पैंजन, २० ग्रॅम चांदीचे बिंदीले, असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, ७० हजार रुपयांची रोकड मेहुणीच्या मुलीच्या लग्नात उडवल्याची कबुली त्याने दिली.
रोड, नंदूरबार), असे आरोपीचे नाव आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून नंदूरबार, परभणीत त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली. शीतल विनोद वाघमारे (३१, रा. ब्ली नं ६, आनंदनगर) या फिर्यादी आहेत. त्यांच्या सासूच्या कपाटाचे लॉक खराब झालेले आहे. २८ मे रोजी दुपारी एकजण गल्ली येऊन कपाटाचे लॉक दुरूस्त करा, असा आवाज देत होता. त्यांनी आवाज देणाऱ्याला घरात बोलावले. त्याने दुसऱ्या कपाटाची चावी मागवून घेत त्यावरून या कपाटाची चावी बनवली आणि माप घ्यायला कपाटाकडे गेला. कपाटातील ३० ग्रॅमचा नेकलेस, ८ ग्रॅम सोन्याची पोत, १ ग्रॅम सोन्याचा ओम, ३० ग्रॅम चांदीचे पैंजन, २० ग्रॅम चांदीचे कडे, २० ग्रॅम चांदीचे बिंदिले आणि ७० हजार रुपये रोकड लंपास केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions









