पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

Foto
पैठण, (प्रतिनिधी): पैठण तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी गारांचा खच साचला होता. या मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पैठण तालुक्यात अवकाळी पाऊस पडला होता. त्याचे पंचनामे अद्याप सुरू झाले नसताना पुन्हा सोमवारी रात्री पैठण तालुक्यातील जवळपास सर्वच मंडळामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे गव्हाचे, कांद्याचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे झाडे पडले असल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच तालुक्यात सर्वत्र वीज पुरवठा खंडित झाला होता. तर काही ठिकाणी विज पडल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र कोणतेही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त आहे.