छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील तापडिया कासलीवाल ग्राउंड येथे १० ते १२ एप्रिल असे तीन दिवसीय श्री हनुमान कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत ही कथा संपन्न होणार आहे.
या कथेमध्ये प्रख्यात वक्ते प. पू. स्वामी गोविंददेव गिरी मार्गदर्शन करणार आहेत. स्वामीजी हे श्रीराम जन्मभूमी न्यास, अयोध्या यांचे कोषाध्यक्ष तसेच श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास, मथुरा येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांच्या प्रभावी वाणीमुळे देशभरात त्यांचे विशेष स्थान आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्था आणि समन्वय परिवार, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












