सिल्लोड, (प्रतिनिधी): रहिमाबाद येथील हर्षल समाधान साळवे याची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला.
भारतीय सैन्य दल २ जुलै २०२५ रोजी संभाजीनगर आय ऑन झोन येथे ऑनलाईन परीक्षा, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी छावणी छत्रपती संभाजीनगर येथे ग्राउंड घेण्यात आले आणि या सर्वाचे फळ म्हणजे हर्षल समाधान साळवे ह्या
वडिलांसोबत वेठबिगारी करणाऱ्या व दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या मुलाची भारतीय स्थल सैन्यात निवड झाल्याची माहिती ३१ मे २०२६ रोजी जनरल ड्यूटी म्हणून पदावर झाली.
हर्षल याची ट्रेनिंग सागर मध्य प्रदेश येथे होणार असल्याचे या वेळी समजले. साळवे परिवारातील भीम सैनिक हा भारतीय सैनिक होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याच्या भावना वडील समाधान साळवे यांनी व्यक्त केल्या.












