हर्षवर्धन हा माझ्यासमोर कुत्र्या सारखा, भुंकू द्या काय भुंकायच तर- खा. चंद्रकांत खैरे

Foto
औरंगाबाद-आमदार हर्षवर्धन जाधव लोकसभेच्या जोरदार तयारीला लागले असून त्यांनी रविवारी  औरंगाबाद येथील सर्वच उर्दू भाषेतील वृत्तमानपत्रातून एका जाहिरातीद्वारे भाजप,शिवसेना, एमआयएम, ह्या जातीयवादी टोळ्या आहेत, त्यांना वेळीच थांबवले पाहिजे. शहरातील धार्मिक सलोखा उध्वस्त करण्याचे काम खासदार खैरे यांनी केले असून त्यांची मानसिकता आतंकवादी प्रकारातील असून या आतंकवाद्याला जमिनीत गाडून टाकण्याचे काम हिंदू आणि मुस्लिम मतदारांना करावे लागणार आहे. त्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांना कुत्रा म्हणून प्रतिक्रिया दिली आहे.
 
काय म्हणाले खैरे 

खैरे म्हणाले की मी याविषयावर बोलायला सध्या तरी टाळतो कारण हर्षवर्धन हा माझ्यासमोर कुत्रा आहे. आणि कुत्र्याचं कामच भुंकने असतं त्याला सध्या काय भुंकायच ते भुंकू द्या निवडणूक झाल्यावर त्याला दाखवू कोण कोणाला जमिनीत गाडतो ते. तोपर्यंत खैरेला तो नक्षलवादी म्हणू द्या आतंकवादी म्हणू द्या त्याचा हिशोब चुकता केला जाईल.