दोन्ही व्रत करता येणार
छत्रपती संभाजीनगर, : (सांजवार्ता ब्युरो) यंदा हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी म्हणजेच गणेशस्थापना एकाच दिवशी येत असल्याने भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र धर्मशास्त्रानुसार दोन्ही व्रते करता येतात, अशी माहिती ज्योतिषाचार्य पं. ऋषिकेश रविंद्र चौधरी यांनी दिली.
युगपद् यदि सम्प्राप्तं व्रतद्वयमथापि वा... शक्तितः सर्वमेव कार्यं न त्याज्यं धर्मसाधनम् याचा अर्थ, जर एकाच दिवशी दोन व्रते एकत्र आली, तर आपल्या शक्तीनुसार दोन्हींचेही अनुष्ठान करावे; धर्मरूप कर्माचा त्याग करू नये. या वर्षी जरी हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी म्हणजेच गणेशस्थापना एकाच दिवशी आले तरी दोन्ही व्रते करता येतात. प्रत्येक व्रत त्याच्या स्वतः
च्या तिथी आणि कालानुसार करावे, हा धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. हरतालिका व्रत हे सूर्योदय व्यापिने तिथीला करावे व पार्थिव गणेश स्थापना मध्यान्य व्यापिंनी तिथीला करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे. दोन्ही व्रते एकाच दिवशी सकाळी करावीत. यापूर्वी २००६ व २००९ साली असाच
असे करावे व्रत
सकाळी स्नान करून हरतालिका व्रताचा संकल्प करावा. हरतालिका पूजन करावे. व्रत करणाऱ्या स्त्रीयांनी उपवास करावा. त्यानंतर लगेच गणेशस्थापना व गणेशपूजन करावे. हरतालिकेचे व्रत पण पुढे चालू ठेवावे. ज्यांचा निर्जली किंवा उपवासाचा नियम असेल त्यांनी तोच पाळावा. गणपतीला नैवेद्य दाखवला तरी व्रत करणाऱ्या स्त्रीने त्याचा फक्त वास घ्यावा. तो ग्रहण करणे आवश्यक नाही.
हरतालिकाच्या दिवशी गणेश चतुर्थी स्थापनेचा उत्सव होऊन गेला आहे. यावर्षी १२ दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यापूर्वी २०१७ साली असाच १२ दिवसांचा गणेश उत्सव होऊन गेला आहे, असेही पं. ऋषिकेश रवींद्र चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
4
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















