मनपाच्या २५ नगरसेवकांना अपात्रतेच्या सुनावणीची नोटीस
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): अनधिकृत बांधकाम, तीन अपत्ये, अतिक्रमण आणि मनपा प्रशासनाच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपांवरून शहरातील न २५ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार ट निर्माण झाली आहे. तक्रारदारांच्या मागणीनंतर महापालिका आयुक्तांनी या सर्व नगरसेवकांना महापालिका अधिनियमाच्या कलम १० (ड) (१) नुसार सुनावणीसाठी नोटिसा बजावल्या र आहेत. नोटीस प्राप्त झालेल्यांमध्ये विरोधी व पक्ष असलेल्या एमआयएमच्या १८, भाजपच्या ६ आणि शिवसेना (शिंदे गट) च्या एका नगरसेवकाचा समावेश असून, या धडक व कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
न
T -र
-
मनपा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात तक्रारी - दाखल करण्यास सुरूवात केलेली आहे. यांना व बजावली नोटीस एमआयएम अब्दुल समीर साजिद (विरोधी पक्षनेता), सय्यद उसामा अब्दुल कदीर, नूर जहा इकबाल, फेरोज खान न मोईनुद्दीन खान, खान अब्दुल मतीन, मोहम्मद वसीम अलीम अहेमद, सय्यद सोहेल सय्यद
८
महेमूद, मेराज खान जलील खान, मुन्शी भिकन शेख, शेख नर्गीस सलीम, मो. वाजेद मो. अय्युब, फरजाना शेख गुलाम रसूल, पठाण मजहर पठाण अय्युब, अली मीर वाजीद, अशोक रंगनाथ हिवराळे, काकासाहेब काकडे, तरन्नूम अकील अहेमद, शाहीन रहीम पटेल. भाजप : मयूर वंजारी, संगीता सांगळे, भारती सोनवणे, जीवकपाल हिवराळे, गणेश नावंदर, विश्वनाथ स्वामी. शिवसेना अभिजित जीवनवाल.
११५ नगरसेवकांविरोधात तक्रारी
तीन अपत्ये, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, मनपा प्रशासनाच्या कारवाईला विरोध करत, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कारणास्तव नगरसेवकांवर महापालिकेच्या अधिनियमाच्या कलम १० (ड) (१) नुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेतील निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांपैकी नगरसेवकांविरोधात या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. महापालिकेच्या निवडणूक विभागाने ऑगस्ट महिन्यात १७ व २४ रोजी आणि सप्टेंबर महिन्यात ७ आणि २५०१५ रोजी सुनावणी ठेवली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












