शिवना येथे हजरत शमशेरचिस्ती उर्फ बगदादी रहमतुल्ला यांचा संदलसह उरूस उत्साहात

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिवना येथे हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत शमशेरचिस्ती उर्फ बगदादी रहमतुल्ला यांच्या पवित्र दर्याचा संदल व उरूस मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

उरूसानिमित्त सोमवारी (दि. १७) सायंकाळी पारंपरिक धार्मिक विधी पार पडले. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी पदाधिकारी व मान्यवरांसह दर्यास सदिच्छा भेट देत चादर अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित नागरिक व भाविकांना उरूसानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

यावेळी दर्गा परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शिवना तसेच परिसरातील हिंदू - मुस्लिम बांधवांनी मोठ्या श्रद्धेने दर्यास भेट देत दर्शन घेतले. अनेक वर्षांपासून शिवना येथील हजरत शमशेरचिस्ती उर्फ बगदादी रहमतुल्ला यांच्या दर्यावर संदल काढण्याची परंपरा अखंडपणे सुरू असून, यंदाही ही परंपरा उत्साहात पार पडली. 

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, जि. प. सदस्य देविदास पालोदकर, राजू बाबा काळे, सय्यद नासिर हुसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, संचालक संदीप राऊत, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शेख सलीम हुसेन, नगरसेवक विशाल जाधव, प्रशांत क्षीरसागर, राजीव गौर, आशिष कटारिया, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, निजाम पठाण, हाजी शेख सलीम तसेच गावातील शेख कादिर, शेख बशीर, मौलाना अजिजुल मुस्तफा, अशरफ काजी सर, जुना गावाचे सरपंच डॉ. सलमान खान, मुरलीधर (राव काका) काळे, ग्रामपंचायत सदस्य शामराव होळकर, सलीम हाजी, माजी सरपंच इस्माईल कुरेशी, शेख बशीर, नजीर भाई, हाजी बाबूमिया यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.