सिल्लोड तालुक्यातील भवन येथील घटना
सिल्लोड, (प्रतिनिधी) भांडण सोडवायला गेला अन जाव गमावन बसला. ही घटना तालुक्यातील भवन येथे ३ एप्रिल रोजी दुपारी ४:३० वाजता ही घटना घडली. प्रकाश मोहिते (वय ५०) असे मयताचे नाव आहे.
सिल्लोड तालुक्यातील भवन येथील शोभा प्रकाश मोहिते यांनी याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली. त्यानूसार भवन येथील नात्याने दीर असलेले आरोपी संजय आसाराम मोहिते आणि अनिल मनोहर मोहिते यांनी फिर्यादी शोभा ह्या ३ एप्रिल रोजी दुपारी ४:३० वाजता घरात एकट्या असताना त्यांना त्यांना चापटबुक्याने मारहाण केली.
यावेळी त्यांचे पती प्रकाश आले असता त्यांनाही संजय मोहिते हे भांडण मिटविण्यास आणि अनिल यांनी मारहाणी आहे. यापैकी राज्यर केली.
प्रकाश यांना रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती असतानाही त्या दोघांनी मारहाण केल्याने प्रकाश यांना अटॅक आला, यात त्यांचा मृत्यू झाला. शोभा प्रकाश मोहिते यांच्या या ग्रामीण पोलीसठाण्यात संजय मोहिते आणि अनिल मोहिते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान संजय मोहिते यास अटक करण्यात आली असून अनिल मोहिते हा फरार झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्रसिंग ठाकरे यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनिष जाधव करीत फिर्यादीवरून सिल्लोड आहेत.














