आरोग्य मंत्र्यांची गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट; कामकाजावर नाराजी

Foto
दौऱ्यानंतर दोन डॉक्टरांवर कारवाई करणार; आरोग्य मंत्र्यांचा इशारा, 

दोन डॉक्टरांवरील प्रस्तावित कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ


गंगापूर, (प्रतिनिधी) : राज्याचे आरोग्य मंत्री यांनी शनिवारी आरोग्य संवाद यात्रेअंतर्गत लासुर स्टेशन आणि गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील कामकाजाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दौरा संपल्यानंतर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून लासूर स्टेशन आणि गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात येत आहे. यामध्ये रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, औषधसाठा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता तसेच रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांचा आढावा घेण्यात आला. विशेषतः आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाबाबत आरोग्य मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर दोन डॉक्टरांवर कारवाई करण्याचे संकेत दिल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरांवर नेमकी कोणती कारवाई होणार आणि रुग्णालयातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कोणते निर्णय घेतले जाणार, याकडे गंगापूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

याप्रसंगी भेटीदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, डॉ. ज्ञानेश्वर निळ, दिलीपसिंग राजपूत, भाजपचे शहराध्यक्ष मारुती खैरे, भाग्येश गंगवाल, गोपाल वर्मा, कृष्णकांत व्यवहारे, सचिन काकडे, आनंद पाटील, दीपक साळवे, आयाज अहमद, सविता शहाणे, यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

मित्र व्यवस्थेत डुप्लिकेट व्यवस्था असल्याचा मुद्दा अतुल रासकर यांनी आरोग्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिला. या प्रकाराची माहिती मिळताच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नाराजी व्यक्त केली आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून याबाबत जाब विचारला.

यापूर्वी आरोग्य मंत्र्यांनी गंगापूर व लासुर स्टेशन येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी कर्करोग उपचार सेवेसंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या भेटीदरम्यानही त्यांनी रुग्णालयीन कामकाजाची माहिती घेतली.

या दौऱ्यावेळी आमदार प्रशांत बंब, माजी आमदार अण्णासाहेब माने, विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे, डॉ. अमोल भोर, स्वीय सहाय्यक अक्षय जाधव, आरोग्य सेवा संचालक डॉ. कांदेवाड, छत्रपती संभाजीनगर परिमंडळाच्या उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी रंगनाथ तुपे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.