सिल्लोड, (प्रतिनिधी): आज आपण हृदय विकार या अतिशय गंभीर आणि वाढत्या आजाराने चिंतीत आहोत, सध्याच्या काळात हृदयविकाराचे प्रमाण वेगाने वाढत आहे. बदलती जीवनशैली, तणाव, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि व्यसनाधीनता ही या मागची प्रमुख कारणे आहेत.
हृदय विकाराचे वाढते प्रमाण आजच्या घडीला तरुणांमध्येही हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब आणि ब्लॉकेजसारख्या समस्या आढळून येत आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अनेक वेळा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रुग्ण वेळेवर उपचार घेत नाहीत. हृदय विकाराची प्रमुख लक्षणे छातीत दुखणे किंवा दडपण जाणवणे श्वास घेण्यास त्रास डाव्या हातात, मान किंवा जबड्यात वेदना जास्त घाम येणे, मळमळ अचानक थकवा किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. हृदय विकार टाळण्यासाठीः संतुलित व कमी तेलकट आहार घ्यावा नियमित व्यायाम व चालणे करावे, धूम्रपान व मद्यपान टाळावे तणाव कमी करण्यासाठी योग व ध्यान करावे, नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी.
बालाजी हॉस्पिटल च्या वतीने डॉ बिरेंद्र झलवार आणि सिद्धेश्वर हॉस्पिटल च्या वतीने डॉ. अभिलाष गोलेचा यांनी आत्तापर्यंत उपचार घेतलेल्या रुग्णबद्दल माहिती दिली. तसेच हृदयावीकर तज्ञ आता सिल्लोड येथे येऊन सुविधा देत आहेत. आमच्या मार्फत
हृदय आरोग्याबाबत जनजागृती, मोफत तपासणी शिबिरे व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून दिला जात आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
हृदय निरोगी ठेवणे ही काळाची गरज आहे. योग्य वेळी घेतलेली काळजी आणि उपचार अनेकांचे प्राण वाचवू शकतात.
या महत्त्वाच्या विषयावर समाजात जागृती निर्माण करण्यासाठी माध्यमांची भूमिका फार मोलाची आहे. पत्रकार परिषदेस, डॉ विक्रांत देशमुख, डॉ बिरेंद्र झलवार, डॉ. लीना झलवार, डॉ. अभिलाष गोलेचा डॉ. विनोद लोखंडे, जयदीप रनसिंग उपस्थित होते. मेडिकव्हर हॉस्पिटलच्या नवीन उपक्रमाबद्दल सेंटर हेड डॉ. विशाल कुटे यांनी माहिती दिली.












