छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): उन्हाचा तडाखा जसजसा वाढू लागला आहे तसतसा पाणी पुरवठ्यातील खंडदेखील वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शहराला सध्या ७००, ९०० आणि १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा होतो. या तिन्हीही योजनांमधून दररोज सुमारे १४ कोटी लिटर ते साडेचौदा कोटी लिटर पाणी उपलब्ध होते. जायकवाडी ते नक्षत्रवाडीच्या दरम्यान हे पाणी येताना रोज एक ते दीड कोटी लिटर पाण्याची गळती होते, त्यामुळे प्रत्यक्षात रोज साडेतेरा कोटी लिटर शहरासाठी उपलब्ध होते. शहराचा वाढता विस्ताव आणि पाण्याची
मागणी लक्षात घेता उपलब्ध होणारे पाणी अपुरे असल्याचा दावा पालिकेकडून केला जातो. त्याचा परिणाम म्हणून पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा पर्याय महापालिकेच्या प्रशासनाने निवडला आहे, परंतु किंवा सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. बहुतांश भागात आठव्या दहाव्या दिवशी पाणी पुरवठा होत आहे. शहराच्या काहीच भागात पाचव्या
दरम्यान, शहर आणि परिसरातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी शहराच्या वेगवेगळ्या भागातून
होऊ लागली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. तापमान सातत्याने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या टाळण्यासाठी उन्हाळ्यात पाणीबाणी महापालिकेने नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहराच्या वेशीवर नव्या योजनेचे पाणी आता आले आहे. त्यासाठीच्या पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. महापालिका प्रशासनाने त्यासाठीची सज्जता ठेवली आहे. त्याकडेही शहरवासीयांचे लक्ष आहे. यासंदर्भात महापौर समीर राजूरकर म्हणाले, पाणी पुरवठ्यातील खंड कमी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून ते शक्य होईल असे वाटत नाही. नवीन पाणी पुरवठा योजनेचे पाणी आल्यावर ते शक्य होईल, त्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम करून घेण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












