ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदार प्रशांत बंब यांची मागणी
राजेंद्र बढे
खुलताबाद, (प्रतिनिधी) : तालुक्यात शनिवारी रात्रभर झालेल्या जोरदार अतिवृष्टीने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले असून लगतच्या शेतात पाणी शिरल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार आमदार प्रशांत बंब यांनी खुलताबाद तालुक्यातील गदाना, गोळेगाव, वेरूळ, तळ्याचीवाडीसह पळसगाव आदी ठिकाणी भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देत तात्काळ आपत्कालीन मदत उपलब्ध करून देण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश दिले. ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदार प्रशांत बंब यांची मागणी
तसेच उद्भवलेली पूरस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमदार प्रशांत बंब यांनी मागणी केली. शनिवारी (दि. २७) तालूकाभरात रात्रीच्या सुमारास ढंग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने फुलमस्ता नदीने धोक्याची पातळी ओलडून गदाना, गोळेगाव, घोडेगाव, भडजी, विरमगाव, देवळाणा, सुलतानपूर परिसरातील एक हजार हेक्टर वरिल पिकाचे नुकसान झाले आहे. परिसरात जोरदार अतिवृष्टीने फुलमस्ता नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरल्याने शेतात राहात असलेल्या मंजुळाबाई संख, हरी संख, रामकृष्ण संख, सुभाष संख,
शेकनाथ अधाने यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य भिजले व सोंगणीला आलेला कपाशी, मका, सोयाबीन, भुईमूग, हे पिक वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पळसगाव शिवारातील शेतकऱ्याचे चार एकर क्षेत्रावरील सुपीक जमिनीची मातीच वाहून गेली व शेताला नदीचे स्वरूप प्राप्त झाले.