राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा , मराठवाड्यातही हायअलर्ट.....

Foto
पुणे : बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे .त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडीशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे .गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा विदर्भात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे .अनेक भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढील चार दिवस वाढणार असल्याचा हवामान खात्याने वर्तवलय .  12 आणि 13 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असून तेरा व 14 सप्टेंबर रोजी कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे .

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाल्याचा समोर आलं आहे . अनेक भागात शेती पिकांना मोठा फटका बसलाय .सोलापूर जिल्ह्यातील 13 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ पाहायला मिळाली . दरम्यान आता राज्यभर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचं IMD नं सांगितलंय .

हवामान विभागाचा अंदाज काय ?


राज्यभरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावत असल्याचे चित्र आहे . मराठवाडा विदर्भात सक्रिय असलेला पाऊस आता राज्यभर व्यापार असून पुढील चार दिवस विविध जिल्ह्यांना हायअलर्ट देण्यात आले आहेत . पुढील दोन दिवस विदर्भ मराठवाडासह मध्य महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी राहणार आहे .कोकण किनारपट्टी मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .रविवारपासून विदर्भात पावसाचा जोर कमी होणारा सून मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीवर पावसाला पोषक वातावरण असेल .

कोणत्या जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट ?


12 सप्टेंबर : पुणे सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली तसेच संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे . छत्रपती संभाजीनगर जालना तसेच कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

13 सप्टेंबर : बहुतांश महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार .धाराशिव लातूर सांगली रायगड व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट . संपूर्ण विदर्भ मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट . मुंबई ठाणे भागात पावसाचा जोर अधिक राहणार .पालघर, धुळे, नंदुरबार व सिंधुदुर्ग जिल्हा हलक्या पावसाची शक्यता .

14 सप्टेंबर : रायगड रत्नागिरी व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट . मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे जिल्हा, सातारा ,सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट .विदर्भात पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही .

15 सप्टेंबर : पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर सातारा पुणे नाशिक घाटमाथा, नंदुरबार ,धुळे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड ,धाराशिव ,लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड