औरंगाबाद: शहरासह परिसरात आज रात्री सात वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाळा सुरुवात झाली असून यामुळे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारा बळीराजा देखील सुखावला आहे.
मराठवाड्यातील अनेक भागात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. आज दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. मात्र, सायंकाळपर्यंत कुठेही पाऊस झाला नव्हता. सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान औरंगाबाद शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. यांनतर तब्बल अर्धा तास पावसाची जोरदार बॅटिंग सुरु होती.










