पावसाचा जोर, पण आयोजकांच्या तयारीमुळे थिरकला फिल्मी दांडियाचा पहिला दिवस
प्रसिद्ध इंस्टाग्राम रील स्टार डॅनी पंडित सुद्धा येणार
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): नवरात्रीच्या निमित्ताने सुरू झालेल्या फिल्मी दांडिया २०२५ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. २७ सप्टेंबर रोजी सागर रिसॉर्ट येथे पार पडलेल्या पहिल्या दिवशीच्या दांडिया नाइटला पावसाचा जोरदार शिडकावा असूनही लोकांनी मनसोक्त मजा केली.
सोहळ्याचे आयोजन ७ रिफ्लेक्शन्स फिल्म्स, सुरेश तांदळे यांनी केले असून, विशेष पावसापासून संरक्षणाची व्यवस्था केल्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला नाही. रंगीबेरंगी लाइट्स, झंझावाती संगीत, ढोल-ताशांचा गजर आणि फिल्मी गाण्यांवर सजलेल्या गार्बा व दांडियाने वातावरण रंगतदार झाले होते. उपस्थितांसाठी मजेदार खेळ, गार्बा स्पर्धा तसेच आकर्षक गिफ्ट्स आणि लकी ड्रॉ यांचीही खास सोय करण्यात आली होती. पहिल्या दिवसाचा खास आकर्षण म्हणजे सर्व वयोगटातील नागरिकांनी एकत्र येऊन कुटुंबासह नवरात्रीच्या उत्सवात भाग घेतला. महिलांसाठी खास प्रवेश व सोयीसुविधांमुळे त्यांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर दिसून आला.
फिल्मी दांडिया २०२५ हा तीन दिवसांचा सोहळा असून २८ व २९ सप्टेंबरलाही संध्याकाळी सहा वाजल्यापासून सागर रिसॉर्ट येथे धमाल रंगणार आहे. पारंपरिक भक्तीभाव आणि आधुनिकतेची सांगड घालणारा हा दांडिया उत्सव शहरातील नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.