जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पैठण येथे हेरिटेज वॉक आणि स्वच्छता मोहीम उत्साहात

Foto
पैठण, (प्रतिनिधी): आपला वारसा.. आपली जबाबदारी.. हा संदेश देत जागतिक वारसा सप्ताहानिमित्त बाळासाहेब पाटील शासकीय वस्तुसंग्रहालय, पैठण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली विशेष हेरिटेज वॉक आणि स्वच्छता मोहीमम शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. वस्तुसंग्रहालयाच्या अभिरक्षक श्रीमती जया वहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशांनुसार या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

सकाळी ऐतिहासिक तीर्थस्तंभ, पैठण येथून या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी  जया वहाणे यांच्या सूचनेनुसार उपस्थितांना पैठणच्या समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे महत्त्व पटवून देण्यात
आले. हेरिटेज वॉकनंतर ऐतिहासिक स्थळांचा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावा, या उद्देशाने संपूर्ण परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून नागरिकांमध्ये वारसा जतनासोबतच स्वच्छतेची प्रभावी जनजागृती करण्यात आली. या हेरिटेज वॉक आणि स्वच्छता मोहिमेत पंढरीनाथ फूलझळके, प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्रा. अर्जुन मोरे व विद्यार्थी, केले.

परिसरातील इतिहासप्रेमी नागरिक आणि स्वयंसेवकांनी हिरीरीने व उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाळासाहेब पाटील शासकीय वस्तुसंग्रहालयाचे कर्मचारी रा. म. शिंदे, सुनील गायकवाड, भिकाराम श्रीखंडे, पांडूरे, भंडारी तसेच तीर्थस्तंभ सुरक्षारक्षक शुभम रुपेकर यांनी परिश्रम घेत आपले कर्तव्य पूर्ण