दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Foto
मुंबई : आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्पुरत्या फटाके विक्रीसह फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथ, गल्ली अथवा रस्त्यापासून १० मीटरच्या आत फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली असून, उल्लंघन करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभर फटाक्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. रस्ते, गल्ली आणि पदपथांवर फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये आणि न्यायालयांपासून १०० मीटरच्या परिसरात फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आवाज करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सण आणि मिरवणुकांमध्ये लेझर, तीव्र प्रकाशाचे दिवे आणि बीम लाइट्स वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

नियमभंग करणार्‍यांवर या कायद्यांनुसार कारवाई
कार्यक्रमांमध्ये ध्वनीची पातळी मोजणारी उपकरणे बंधनकारक करण्यात आली आहेत, खासगी ठिकाणीही निर्धारित ध्वनीमर्यादांचे पालन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. निर्धारित वेळेत कमी प्रदूषण करणारे ग्रीन फटाके वापरण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नियमभंग करणार्‍यांवर ध्वनीप्रदूषण, पर्यावरण संरक्षण, फौजदारी आणि स्फोटक कायद्यांनुसार कारवाई होणार असल्याती माहिती आहे.  च्या ङ्गमहा पर्यावरणफ अ‍ॅपद्वारे नियमभंगाच्या तक्रारी नोंदवता येणार आहेत. ग्रीन फटाक्यांमध्येही विषारी जड धातू आढळल्याचा आवाज फाउंडेशनने दावा केला आहे, त्याचबरोबर सर्व फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याबद्दल हायकोर्टाने प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. निर्बंधांची माहिती नसल्याचे काही पोलीस अधिकार्‍यांनी सांगितल्याची न्यायालयाची नोंद न्यायलयाने घेतली आहे. २६ ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिका,  आणि पोलीस प्रमुखांना हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तात्पुरत्या फटाके विक्रीचे परवाने कधी मिळणार?
दिवाळीनिमित्त तात्पुरत्या फटाके विक्रीचे परवाने ६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी दिले जाणार आहेत. परवान्याची मुदत संपल्यानंतर फटाक्यांची विक्री करता येणार नाही. शिल्लक साठा अधिकृत गोदामात किंवा घाऊक परवानाधारकाकडे परत जमा करणे बंधनकारक राहील. तात्पुरत्या फटाके स्टॉलच्या ५० मीटर परिसरात आतषबाजी करण्यास बंदी आहे. याशिवाय, विदेशी बनावटीचे फटाके विक्री करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि पर्यावरण संरक्षण नियमांनुसार, फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणार्‍या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आहे. १०० पेक्षा अधिक फटाके असलेल्या साखळी बॉम्बवर बंदी घातली आहे. विशिष्ट आकाराच्या ङ्गअ‍ॅटमबॉम्बफवरही कायदेशीर निर्बंध लागू राहतील.