साजवार्ता
Date: 16/11/2026
वाहतूक कोंडीही फुटणार; निधीसाठी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंचे प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) कायम वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेला गजानन महाराज मंदिर आणि पुंडलिकनगर रस्ता परिसर आता मोकळा श्वास घेणार आहे. येथील रोजच्या कोंडीतून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी प्रभाग क्रमांक २२ मधील सुमारे १,२०० ते १,३०० चौरस मीटर मोकळ्या जागेवर भव्य बहुउद्देशीय इमारत उभारली जाणार आहे. नगरसेवक अशोक दामले यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडलेल्या या प्रस्तावानुसार, या इमारतीच्या तळमजल्यावर सुसज्ज भाजी मार्केट, तर वरच्या मजल्यांवर
कांदा 20/kg
शॉपिंग कॉम्प्लेक्स साकारले जाईल. विशेष म्हणजे, याच वास्तूत बंद पडलेली मनपा शाळा पुन्हा सुरू करण्यासोबतच अद्ययावत दवाखानाही उभारला जाणार आहे.
गजानन महाराज मंदिर ते
शेतकऱ्यांचा सन ग्राहकांचा विध
पुंडलिकनगर मार्गावर भाजी विक्रेते मंदिर ते आणि छोटे व्यावसायिक रस्त्यावरच बसत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून म्हणून सी.टी.एस. क्र. १५३०९
जागेची तांत्रिक व्यहार्यता तपासणार
सभागृहाच्या तत्त्वतः मंजुरीनंतर आता संबंधित विभागांकडून जागेची संयुक्त मोजणी केली जाईल. तांत्रिक व्यवहार्यता तपासली जाईल. सविस्तर अंदाजपत्रक तयार केले जाईल. त्यानंतर स्थायी समितीची प्रक्रिया पूर्ण होईल. प्रशासकीय मान्यताही दिली जाईल. त्यानंतर निविदा काढल्या जातील.
नागरिकांसह विक्रेत्यांचे लक्ष
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोट्यवधींच्या प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला जात असला तरी निधीअभावी अनेक कामे कागदावरच रखडल्याचा आजवरचा इतिहास आहे. नगरसेवक अशोक दामले यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सभागृहाची तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्ष निधीची तरतूद केव्हा होणार, हा प्रश्न कायम आहे. हे काम जमिनीवर केव्हा उतरणार, याकडे प्रभाग २२ मधील नागरिकांचे आणि विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.
मधील ५३३ चौ. मी. जागा विकसित केली जाईल. लगतची ६०० चौ. मी. जागाही विकसित केली जाईल. एकूण १३००
चौ. मी. क्षेत्र विकसित होईल. यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांना हक्काचे गाळे मिळतील. रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होईल.
मनपाच्या उत्पन्नातही भर पडेल. बंद पडलेली मनपा शाळाही सुरू होणार आहे, यामुळे कामगार वर्गाची वर्गाची सोय होईल.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












