पैठण येथे गुढीपाडव्याला हिंदू मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : दक्षिण काशीतील पैठणमध्ये गुढीपाडवा सण गुरुवारी रूढी प्रथा व परंपरेप्रमाणे सातवाहन राजांची प्रतिमेची मिरवणूक काढून उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

जुन्या पैठण मधील तीर्थस्तंभउद्यानात गुढीवर पुष्पृष्टी करून सम्राट शालिवाहन राजाचा जयजयकार करून शालिवाहन शके १९४८ नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सम्राट शालिवाहन राजाची जन्मभूमी तथा कर्मभूमी पैठण होती. शालिवाहन राजाने दक्षिण भारतावर विजय मिळवल्यानंतर पैठण त्यांची राजधानी होती. सम्राट गौतमी सातकर्णी राजाने इ. स. ७८ मध्ये नाशिक परिसरातील शक क्षत्रप नहपान याचा पराभव करून विजयाच्या प्रित्यर्थ शालिवाहन शके कालगणना सुरू केली.

 यावेळी अॅड. राजेंद्र गोर्डे, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, प्रा. संतोष गव्हाणे, चेअरमन किशोर चौहान, माजी नगराध्यक्ष शेखर पाटील, सागर पाटील, सामाजिक कार्यकर्ते रमेश खांडेकर, दिनेश पारीख, केदार मिरदे, अश्विनी लखमले आदींची भाषणे झाली.

कार्यक्रमाचे संचालन मदन आव्हाड यांनी केले तर सतीश आहेर यांनी
आभार मानले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी नगरअध्यक्ष सोमनाथ परदेशी, नगरसेवक जितू परदेशी, पवन लोहिया, बलराम लोळगे, पवन मैंड, सूरज गोजरे, बद्रीनाथ खंडागळे, संतोष गोबरे, रमेश लिंबोरे, शिवाजी गाडे, राहुल पगारे, अँड संदीप जाधव, गणेश पवार, अॅड. वैभव चव्हाण, विकी खांडेकर, हर्षवर्धन पाटील, पांडुरंग मोरे, शुभम रूपेकर, सूरज घुले, आकाश दौंड, भानू वायचळ, विवेक काळे, दक्ष खांडेकर, रुपेश चौहान, भाऊसाहेब चोरगे, निलेश परदेशी, ज्ञानेश्वर सपकाळ, पंढरीनाथ
फुळझळके, विलास खर्डेकर, रजत परदेशी, गणेश खंडागळे, शिवाजी गोडसे, गणेश चौहान, हर्षवर्धन पाटील, केदार खंडागळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

शालिवाहन नागरी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन शालिवाहन शक समारोह समितीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी इतिहास प्रेमी, अभ्यासक, संशोधक, तज्ज्ञ यांनी पैठणच्या बसस्थानकाला सम्राट शालीवाहनांचे नाव देण्यासाठी मंत्रालयातील परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, उत्तर प्रदेशातील उत्तर काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या वाराणसी तथा काशी तीर्थक्षेत्राप्रमाणे दक्षिण काशीतील पैठण नगरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्यासाठी विशेष समिती गठित करावी. 

तसेच पैठण येथील प्राचीन वास्तूचे जतन करण्यासाठी केंद्र सरकार तथा महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा. पैठण येथे ज्ञानेश्वर उद्यानात बाळासाहेब पाटील संग्रहालय उभे आहे त्यासाठी आवश्यक तेवढी जमीन महाराष्ट्र शासनाने तात्काळ द्यावी. अशी मागणी केली.