वाघूर नदी पुलाजवळ अपघात; बसच्या पुढील भागाचा चक्काचूर
सिल्लोड, (प्रतिनिधी) अजिंठा परिसरात छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील अजिंठ्याजवळ वापूर नदी पुलाच्या रखडलेल्या कामाजवळ सोमवारी (दि. २८) सकाळी हिरकणी एसटी बसने पोकलेन घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले.
बसच्या पुढील भागाचा चूराडा झाला. या वेळी सुदैवाने जीवितहानी झाली. छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे जाणारी एसटी (एमएच ०६ बीडब्ल्यू १२३६) मुकपाट फाट्याजवळ आली असता हा अपघात झाला. पुण्याहून पहूरकडे पोकलेन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला (एनएल ०१ एल ७६१५) बसने धडक दिली. चालक रतन महादेव कोळी यांनी ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा दावा केला. अपघातानंतर नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढून अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, मुकपाट फाटा ते वाघूर नदी पुलापर्यंत रस्त्याचे काम रखडले असून अपघातस्थळी आवश्यक खबरदारीचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जखमींमध्ये शेख मुक्तार शेख गफार, सय्यद जमील (अजिंठा), द्वारकाबाई विश्वनाथ कुमावत, मंगला मनोज कुमावत (सिल्लोड), बिनाबाई पोपट तेलपुरे (केन्हाळा, सिल्लोड), प्रमिला दगडू सोनटक्के, अब्दुल हमीद अब्दुल रहमान, लक्ष्मण परदेशी, रुस्तम तुळशीराम गोंगे, गोपाल बत्तात्रय फुके (जळगाव), मिराबाई जगन कुमावत (कासोदा), साहिल दिलीप कांबळे (नदिड), वैष्णवी रामदास काटे (बुलढाणा), अमर मनोहर कोल्हे र मनोहर कोल्हे (नागपूर), हनुमान अशोक बाविस्कर (अंबड), मोहम्मद मुजीब रहेमान (नांदुरा), राजू फल (फतेहपुर, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.
प्रितम शेषराव (छत्रपती संभाजीनगर), अर्जुन हरी कुमावत, साहेबराव रूपचंद धनगर, छाया रामभाऊ पाटील, युक्ता जितेंद्र कपाडे, उमा रितेश परदेशी, कृष्णा उमेश परदेशी, मेघा उमेश परदेशी, उमेश परदेशी, शांताबाई लालसिंग परदेशी, लालसिसंग बहादूरसिंग यातील २० जखमींना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.













