अजिंठा येथे स्मृतीदिनानिमित्त पारोला इतिहासप्रेमींकडून अभिवादन

Foto
 सिल्लोड, (प्रतिनिधी) : अजिंठाच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणाऱ्या पारोच्या १७० व्या स्मृतीदिनानिमित्त स्थानिक इतिहासप्रेमींनी शनिवारी सकाळी ११ वाजता अजिंठा येथील पारोच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले.

स्थानिक आदिवासी कन्या पारो व अजिंठा लेणीच्या संवर्धनासाठी इंग्रज सरकारने नियुक्त केलेले इंग्रज अधिकारी रॉबर्ट गिल यांची देश, भाषा, धर्म, प्रांत, जात यांना भेदणारी अजरामर प्रेम कहाणी इतिहासात प्रसिद्ध आहे. पारोचा मृत्यू झाल्यानंतर तिच्याविषयी असलेल्या नितांत प्रेमापोटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रॉबर्ट गिल याने २३ मे १८५६ साली अजिंठा येथील पोलिस ठाणे परिसरात तिची कबर बांधलेली आहे.

 दरवर्षी या दिवशी अनेक इतिहासप्रेमी पारोच्या कबरीवर अभिवादन करण्यास येतात. यावेळी स्थानिक इतिहास संशोधक विजय पगारे, अजिंठा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक विकास चौधरी, निवृत्त केंद्र प्रमुख अन्ना पोळ, पत्रकार अरुण चव्हाण देशमुख, राष्ट्रीय संघटक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती पत्रकार संजय जाधव पत्रकार मुनीर पठाण, संतोष वाघ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.