सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी) :
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७वा वर्धापन दिनानिमित्त सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभपार पडला. याप्रसंगी माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार यांनी उपस्थित सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, संचालक नंदकिशोर सहारे, विनोद मंडलेचा, पांडुरंग दुधे, सुदर्शन अग्रवाल, रमेश साळवे आदिंसह नगरसेवक, सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.