रक्तदान करुन करा शहिदांचे स्मरण : उपसभापती सचिन अहिर

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ शासकीय रक्तपेढी घाटी रुग्णालयाच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वीरांच्या स्मरणार्थ प्रत्येक करावे, अशी अपेक्षा विधान परिषदेचे जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही या शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांच्या उत्साह वाढविला.
सचिन भाऊ अहिर यूथ फाउंडेशनच्या वतीने येथील सिडको परिसरात कालिका माता मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ हे शिबीर आयोजीत करण्यात आले होते. दुपारी
दोन वाजेपर्यंत ३२५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरास उपसभापती सचिन अहिर आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांणी भेट दिली. मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
भविष्यातही उपक्रम राबवावेत : शिरसाट
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, रक्तदान शिबीर हा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम आहे. आयोजकांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले असून, त्याला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाधानकारक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. भविष्यातही सचिन अहिर यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions