छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): हॉटेलमधून घेतलेल्या तंदुरी चिकन पार्सलचे अवघे ७२० रुपये बिलाची मागणी केल्याच्या रागातून बाप-लेकाने हॉटेल चालकावर थेट पिस्तूल आणि चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना कोलठाणवाडी रोडवर घडली. १४ जून रोजी पहाटे दीड ते अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी फजल सिकंदर पटेल आणि त्याचा मुलगा अरफात फजल पटेल (दोघे रा. हसूल) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी फजल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.
न्यायालयाने दोन्ही आरोपींना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फजल एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून हसूल टी पॉइंट इथे आला. समीर यांनी त्याला पार्सल दिले आणि बिलाचे ७२० रुपये मागितले. पैसे मागताच फजलचा पारा चढला. 'मस्ती मे आया क्या, मुझे पहचानता नही क्या, मुझे खाने के पैसे मांगता क्या,' अशी शिवीगाळ करत त्याने पिस्तूल काढले, तर मुलगा अरफातने चाकू काढला. घाबरलेले समीर घराकडे पळत सुटले. मात्र, आरोपींनी त्यांचा पाठलाग करत दगड-विटांनी मारहाण केली. समीर यांचा गळा आवळण्याचाही प्रयत्न झाला. वाद सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या आई-वडिलांनाही या गुंडांनी मारहाण केली. या
गंभीर घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक शेख अन्वर करत आहेत.
समीर अहमद खान (३६, रा. इब्राहिम सिटी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पंचायत समितीजवळ शोरमा आणि बर्गरचे हॉटेल आहे. १४ जून रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास समीर हॉटेल बंद करून साफसफाई करत होते. यावेळी फजल आणि त्याचा मुलगा अरफात तिथे आले. फजलने औषध खायचे आहे, मला तंदुरी चिकन पार्सल
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी
यातील आरोपी फजल हा २०१२ सालच्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. तर बनावट पिस्टल प्रकरणातही आरोपी आहे.
बनवून द्या, अशी विनंती केली. तोपर्यंत मेडिकलवरून येतो, असे सांगून तो निघून गेला. समीर यांनी पार्सल बनवले, मात्र दोघे परत न आल्याने त्यांनी फजलला फोन केला. फजलने समीर यांना पार्सल हर्सलला माझ्या घराजवळ घेऊन या,' असे सांगितले. त्यानंतर पैसे मागितल्यावरून बाचाबाची झाली. दोघांनी समीरवर चाकूहल्ला केला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions
















