अजितदादा आपल्यामागे किती संपत्ती सोडून गेले ? अशी होती राजकीय कारकीर्द ....

Foto
पुणे : बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात मालमत्तेबद्दलची माहिती उघड केलेली. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, अजितदादांकडे एकूण ७,२०,००० रुपये रोख असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे ६,६५,४०० रुपये कॅश आहे. तसेच अजितदादांचे बँकेत ३,९६,५९३ रुपये ठेवी आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बँक खात्यात एकूण ३,६९,९२,०९१ रुपये आहेत.

तसेच अजित पवारांकडे २,४७९,७६० किमतीचे बाँड, तर सुनेत्रा पवार यांच्याकडे १,४९९,६१० किमतीचे बाँड आहेत. याशिवाय अजितदादांनी पोस्ट ऑफिसमध्ये बचत आणि विम्यात १०७,९२१,११५ रुपये गुंतवले असून सुनेत्रा पवार यांनी ४,४२९,४६३ गुंतवले रुपये आहेत. तसेच अजित पवारांकडे विविध कंपन्यांमध्ये ८५ दशलक्ष शेअर्स आहेत.

अजितदादांकडे बर्‍याच आलिशान आणि महागड्या गाड्याही होत्या. अजित पवार यांच्याकडे तीन ट्रेलर, एक टोयोटा कॅमरी, एक होंडा सीआरव्ही आणि एक ट्रॅक्टर तर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर आहेत. तसेच अजित पवार यांच्याकडे ४१.५० किलो चांदी आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे ३५ किलो चांदी, १.३० किलो सोने आणि २८ कॅरेटचा हिरा आहे.

पाच वर्षांत स्थावर मालमत्तेत वाढ

अजित पवार यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत वाढ झाल्याचेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते. २०१९ च्या तुलनेत त्यांच्या स्थावर मालमत्तेत १० कोटींनी वाढ झाली असून प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ३७,१५७,०२९ कोटी रुपयांची स्थावर आणि ८,२२६,०६८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

राजकीय कारकीर्द 

नाव : अजित अनंतराव पवार
जन्मतारीख: २२ जुलै १९५९
जन्मस्थान: देवळाली प्रवरा, राहुरी तालुका, अहमदनगर जिल्हा
शिक्षण: बी.कॉम
ज्ञात भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी
व्यवसाय: शेती
पत्नीचे नाव: पत्नी - सौ.सुनेत्रा अजित पवार
मुले: २ 
मुलगे - पार्थ आणि जय
बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त.
सदस्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्था, पुणे 
रयत शिक्षण संस्था, सातारा संचालक
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष  ऑगस्ट २००६ ते १९ ऑगस्ट २०१८. 
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  सप्टेंबर २००६ पासून 
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन  मार्च २०१३ पासून
सेवादास संचालक : महानंद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन - सप्टेंबर २००५ ते मार्च २०१३ आणि २५ नोव्हेंबर २०१८ पासून अध्यक्ष म्हणून काम करत आहे
पूर्वीच्या विधानसभा / विधानपरिषद / लोकसभा / राज्यसभेचे सदस्य आणि संसद सदस्य / समिती प्रमुख म्हणून केलेले काम (कार्यकाळात)
लोकसभा सदस्य : जून १९९१ ते सप्टेंबर १९९१
विधानसभा सदस्य : १९९१ ते १९९५, १९९५ ते १९९९, १९९९ ते २००४, २००४ ते २००९, २००९ ते सप्टेंबर २०१४, २०१४ ते २६ सप्टेंबर २०१९. २०१९ ते २०२४
राज्य/केंद्रीय मंत्री/राज्यमंत्री म्हणून केलेले काम (कार्यकाळ)
कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री: जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२
पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री: नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३
पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे), फलोत्पादन : ऑक्टोबर १९९९ ते जुलै २००४
ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ): जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४
जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे वगळून), जलसंपदा आणि स्वच्छता :  नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९.
जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे वगळून), ऊर्जा : नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१०
उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१२
उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): डिसेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१४
उपमुख्यमंत्री : २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९
उपमुख्यमंत्री : ३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२
विरोधी पक्षनेते : ४ जुलै २०२२ ते ३० जून २०२३ 
उपमुख्यमंत्री : २ जुलै २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२४
आता महायुती सरकारच्या काळात देखील ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते.

कुटुंबातील सदस्य

अजित पवार यांच्या कुटुंबा चार सदस्य होते. अजित पवार यांच्या पत्नीचं नाव सुनेत्रा पवार असं आहे. तर त्यांना दोन मुलं आहे. पार्थ पवार आणि जय पवार ते अनेकदा त्यांच्या कुटुंबासोबत विविध कार्यक्रमांमध्ये दिसले. पवारांच्या पत्नी अनेकदा त्यांच्यासोबत निवडणूक सभांमध्ये जात असत. अजित पवारांचा मोठा मुलगा पार्थ यानेही निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. अजित पवार यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या मोठ्या भावाचं नाव श्रीनिवास पवार असं आहे. दोन्ही भावांमध्ये खूप चांगले संबंध होते. त्यांच्या बहिणीचे नाव विजया पाटील आहे. त्यांचे काका शरद पवार आहेत, जे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती आहेत. राजकारणातील अजित पवार यांचा प्रवास अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ मध्ये झालेला. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात अजित पवार यांचा झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार हे मुंबईतील प्रसिद्ध राजकमल स्टुडिओमध्ये काम करायचे. वडिलांच्या निधनानंतर अजित पवार यांना शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली.