पैठणमध्ये विराट हिंदू संमेलन उत्साहात

Foto
पैठण, (प्रतिनिधी) पैठण येथे सोमवारी (दि. २०) रोजी एप्रिल रोजी विराट हिंदू संमेलन अत्यंत उत्साहात व भव्य स्वरूपात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात खंडोबा मंदिर, बसस्थानक चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील संमेलन स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेने झाली. भव्य यानंतर शौर्यपूर्ण लाठी काठी खेळांचे प्रात्यक्षिक तन्मय नेऊरगावकर यांनी सादर सदर केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर गौरी दहिभाते या विद्यार्थिनीने भावनिक कविता सादर केली.

याप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागत गीत मिलिंद बुवा गोसावी व त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केले, तन मन हिंदू हे गीतही सादर झाले. प्रारंभी दीपप्रज्वलन व भारतमातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रचना शिंगवी यांनी भूषवले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभक्त परायण विष्णू महाराज जगताप यांनी केले. त्यानंतर दिवाकरराव कुलकर्णी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ङ्गङ्घपंच परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन केले. सुदर्शन महाराज कपाटे यांनी देशातील विविध सामाजिक प्रश्न, बदलता लोकसंख्येचा समतोल व हिंदू समाजासमोरील आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले.

भरत आमदापुरे यांनी ऐतिहासिक पार्श्वभूमी व सामाजिक मानसिकतेचा सखोल उहापोह केला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप रचना शिंगवी यांनी केला. आभार प्रदर्शन शिवराज पारिख यांनी केले. तर खर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिकरीत्या वंदे मातर गायले गेले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम खरात यांनी केले. 

अशा प्रकारे पैठण येथील विराट हिंदू संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. संमेलनासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि समाजातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.