'जय श्री राम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सिडको एन-७ येथील रामलीला मैदानावर विजयादशमीच्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी उत्साहात रावणदहन पार पडले. उत्तर भारत संघातर्फे आयोजित या सोहळ्यात ६५ फूट उंच रावण आणि ६० फूट उंच कुंभकर्णाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. आतषबाजी सुरू असतानाच 'जय श्री राम'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला व मैदानावर भक्तीमय वातावरण तयार झाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे उपस्थित
होते. याप्रसंगी महापौर समीर राजूरकर, सभापती अनिल मकरिये, नरेंद्र गुप्ता, बंटी दीक्षित, शिवाजी दांडगे, प्रशांत देसरडा, आकाश कागलीवाल, राजेश भारुका, सुयोग माच्छर, गौतम नंदावत, राजेंद्र माहेश्वरी, लक्ष्मीनारायण शर्मा, बच्छूसिंह लोधी, ओमीराम पटेल, विनोद दीक्षित, सुरजन सिंह, अरविंदर बिर्दी, सुशील सिंह, प्रमोद देवकर, मुरलीधर शर्मा, नरेश शहाणी, जगदीश लोधी, गणेश आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, वाळूज परिसरातही रावण वधानंतर करण्यात आलेल्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














