गंगापूर - वैजापूर रोडवरील भीषण अपघातात पती-पत्नी ठार

Foto
गंगापूर (प्रतिनिधी) :  गंगापूर  - वैजापूर रोडवरील चोर वाघलगाव परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात गंगापूर शहरातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गंगापूर येथील लक्ष्मी माता मंदिर जवळ रहिवासी अलीमुद्दीन कम्रद्दीन सय्यद (वय ६२) आणि त्यांची पत्नी हानीफाबी अलीमुद्दीन (वय ५९) हे आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी वैजापूर तालुक्यातील म्हस्के येथे टीव्हीएस मोटरसायकल (क्रमांक एम एच २० एफ ए ४३८०) हे मोटरसायकलने जात होते.
अज्ञात त्यावेळी चोर वाघलगाव जवळ वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर दोघांना तात्काळ वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे गंगापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. विरगाव पोलीस अधिक तपास करत असून अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू आहे.