मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला जिवंत जाळले!

Foto

औरंगाबाद:  पत्नीला जिवंत जाळून मारल्याप्रकरणी पतीसह तिघांजणांविरुद्ध सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

मयूर पार्क येथील रहिवासी माधवराव बनकर यांची मुलगी प्रिया वय 25 हीचा  सिल्लोड अंधारी येथील धम्मपाल शेजवळ याच्याशी दोन वर्षांपूर्वी विवाह करून देण्यात आला होता. तिला मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींकडून मागील 14 महिन्यांपासून छळ सुरू होता. पती धम्मपाल शेजवळ, सासू अरुणा उत्तम शेजवळ,मामे सासरा अ‍ॅड.विजय वानखेडे यांनी संगनमताने अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले.  शेजारच्या आग विझवली असता पती धमपाल याने प्रियाला घाटीत दाखल करून करून पळ काढला.  मृत प्रिया हीची  14 महिन्यांची मुलगी आहे.  आज प्रिया हीच घाटीत मृत्यू झाला.