छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पतीकडून होणाऱ्या छळाचा पाढा वाचण्यासाठी आणि पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी एक पत्नी पोलिस ठाण्यात पोहचली. मात्र, ज्याच्याविरुद्ध ती तक्रार देणार होती, त्याच पतीने घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी तिला दिली. तक्रार देण्यापूर्वीच पतीच्या आत्महत्येची बातमी कानावर पडताच पत्नीने पोलिस ठाण्यात एकच हंबरडा फोडला. ही हृदयद्रावक घटना वाळूज महानगरातील रांजणगाव
शेणपुंजी येथील ओम साई नगरमध्ये शनिवार (दि.२५) उघडकीस आली.
या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव पवन ज्ञानेश्वर भुते (वय २२, मूळ रा. रहिमाबाद, ता. सिल्लोड) असे आहे. पवन हा पत्नीसह रांजणगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मात्र, गुरुवारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वादातून नाराज झालेली पत्नी पतीविरुद्ध तक्रार करण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलिस पोहोचली होती. ठाण्यात
पत्नी पोलिस ठाण्यात असतानाच घरात एकट्या
असलेल्या पवनने छताच्या पंख्याला गळफास घेतला. शनिवारी सकाळी पवनच्या भावाने खिडकीतून पाहिले असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुहास मुंडे व मनोज बनसोडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून पवनला घाटी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, कौटुंबिक वादातून एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












