आयकॉनच्या विद्यार्थिनींनी बंदी, बांधवांसोबत केले रक्षाबंधन साजरे

Foto
आयकॉनची राखी बंदी बांधवांच्या हाती

पैठण, (प्रतिनिधी): विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल पैठणच्या वतीने संस्थाध्यक्ष प्रा. संतोष पाटील तांबे यांच्या मार्गदर्शनाने प्राचार्य आर. बी. रामावत यांच्या नेतृत्वाखाली खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग १ येथील खुल्या करागृहात बंदी बांधव व आपलं कर्तव्य बजावित असताना घरी जाऊ न शकणारे अधिकारी, कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

रक्षाबंधन निमित्त खुल्या कारागृहातील बंदी बांधवांना राखी बांधत असताना त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्नता दिसून येत होती. आगळावेगळा असा भाऊ बहिणींचा रक्षाबंधनाचा हा पवित्र सण आयकॉन परडाईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बहिणींनी बंदी बांधवांना राखी बांधून साजरा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर. बी. रामावत यांनी करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी.

सहकार्याची भावना निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी रक्षाबंधनाचे महत्त्व समजून सांगत खुला जिल्हा कारागृहाच्या अधिक्षक व सर्व सहकाऱ्यांनी ही संधी दिल्याबद्दल शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले. खुले कारागृहाचे वरीष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले यांनी उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. बंदी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

मनोगत व्यक्त करताना बंद्यांना भरून आले होते. चेहऱ्यावर आनंदाश्रू वाहताना दिसून येत होते. विद्यार्थ्यांच्या
वतीने वैदेही गवळी, दिपाली सव्वाशे, वैष्णवी औटे, गीतांजली येळे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करताना बंद्यांना राखी बांधताना मन गहिवरून आले असे सांगितले. गीतांजली येळे हिने शोधिसी मानवा राउळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी हे भावगीत सादर करत सर्वांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी खुले जिल्हा कारागृह अधिक्षक बाळ राजेंद्र निमगडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले, तुरुंगाधिकारी विरसिंग पाडवी, डॉ. भारत काकडे, डॉ. अंबर मडावी, श्रीराम खाडे पाराजी सोन्नर (कारागृह शिपाई), शिवाजी केदार (हवालदार), योगेश नरोडे (करागृह शिपाई), सोमनाथ निवारे (का. हवालदार), सुंदर्डे (का. शिपाई), यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी राहुल गिहे (पत्रकार) यांची उपस्थिती होती. आभार लता पवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका वरकड, लता पवार, नितीन कटारे, यश परदेशी, राम तांबे, दुर्गादास झिंजुर्डे, सलीम शेख आदींनी प्रयत्न केले.