कोट्यावधी रुपयांची जमीन अवैध मार्गाने विक्री करून अवैध बांधकामे

Foto
वक्फ मंडळाचे दुर्लक्ष

पैठण, (प्रतिनिधी) : नुकतीच समाज माध्यमांवर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची एक जाहिरात वाचण्यात आली. त्यात वक्फ म्हटले आहे की वक्फ संपत्तीची अनाधिकृत खरेदी विक्री व निर्माण हे कायदेशीर रित्या गुन्हा आहे, 

कोणीही असा व्यवहार करताना आढळल्यास मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र पैठण शहरातील सर्वे नंबर १७३, १७४ व१८९ असे बरेचसे सर्वे नंबर आहे ज्याचा अवैध खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला असून या व्यवहाराच्या तक्रारी चा पाऊस वक्फ मंडळाच्या कार्यालयात पडला आहे.

मात्र मंडळांने एकही कार्यवाही केलेली नाही, हे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. मग या समाज माध्यमांवरील जाहिरातींचा फार्स कशासाठी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. वक्फ मंडळ व दर्गाचे इनामदार यांच्या संगणमताने हि अवैध खरेदी विक्री करून दर्गाच्या जागेवर विनापरवाना पक्के बांधकाम करणारे वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? मंडळाला आपल्या जाहिरातीला तंतोतंत जर खरे उतरायचे असेल तर वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पैठण
शहरातील वर दर्शवलेल्या सर्वे नंबर वर फेरफटका मारावा व या ठिकाणी झालेली खरेदी विक्री रद्द करून त्या सर्व जागा ताब्यात घेण्यात यावे अशी मागणी होत आहे. 

ही मागणी बऱ्याच वेळा झालेली आहे. मात्र वक्फ मंडळांने आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मग हे समाज माध्यमांवरील जाहिरातीचे थोतांड कशाला? असा प्रश्न यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहे.