गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी अवैध वाळू उपशाविरोधात ठोस पाऊल उचलत अमळनेर शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा उधळून लावला. या कारवाईत वाळू उपशासाठी वापरण्यात येणारी एक मोठी बोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गंगापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली. कारवाईदरम्यान संबंधित वाळू माफियांनी पळ काढल्याची माहिती असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून नदीपात्रात गोदावरी कोणत्याही परिस्थितीत अवैध वाळू उपसा खपवून घेतला जाणार नाही.
पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहतील. कुमारसिंग राठोड पोलीस निरीक्षक गंगापूर पोलीस स्टेशन पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत.















